आ. सत्यजीत तांबे अहमदनगरला पोहोचवणार ‘पर्यटनाच्या नकाशा’वर

 प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २३ विकासकामांना मंजूरी 
पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारनगर : महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर वरचं स्थान देण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २३ विकासकामांसाठी तब्बल ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या स्थळांचा विकास पर्यटन स्थळ म्हणून झाल्यास स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या विकासात हातभार लागणार आहे. 

पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा, केरळ आदी राज्यांची उदाहरणे समोर ठेवून राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रादेशिक पर्यटन वाढीला लावण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत अहमदनगरमधील तब्बल २८ स्थळांचा विकास व्हावा, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने प्रयत्न केले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून २८ पैकी २३ ठिकाणांच्या विकासासाठी निधी मंजूर झाला. 

------------

प्राचीन वारसा जपणे आपली जबाबदारी!

अहमदनगर येथील काही मंदिरे व चर्च तसेच चौक व परिसर यांचे सुशोभिकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. यातील काही वास्तू या प्राचीन असून त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच काही वास्तूंना संरक्षण भिंतीचीही आवश्यकता आहे. जेणेकरून वास्तूच्या परिसरात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत. यासाठी नागरिकांकडून वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे सततच्या पाठपुराव्यानंतर आता यश मिळाले आहे. अहमदनगर येथील एकूण २३ विकासकामांना मंजूरी मिळाली असून उर्वरीत पाच ठिकाणांसाठीही पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन तर वाढेलच आणि रोजगाराची निर्मिती होईल.

 – आ. सत्यजीत तांबे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या