चितळी ग्रामपंचायतीच्या राजकारणाची समीकरणे बदलली
राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जाहीर झाल्यापासून ते सरपंच उपसरपंच निवडी होण्यापर्यंत अनेक राजकीय हालचाली दिसुन आल्या. यावेळी अनेकदा स्थानिक पातळीवर राजकिय समीकरणे बदलली असून ग्रामपंचायतीच्या निवडणुका विश्वासू कार्यकर्त्यांनी पक्ष बदलून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यास पसंती दाखवली.काल शुक्रवारी (दि.२४) रोजी चितळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिये द्वारे उपसरपंच पदाच्या निवडी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. यावेळी गावकरी विकास मंडळ (कोल्हे गट) यांच्या कडून विजयी झालेल्या उमेदवार कविताताई पगारे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता व काळे गटाचा पाठींबा घेतला होता या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त पद्धतीने मतदान पार पडले या मतदानात उपसरपंच कविताताई पगारे यांना ६ मते मिळाले होते. त्यांची उपसरपंच पदी सर्वानुमते निवड झाली होती. परंतु अनेक वेळा गावकरी विकास मंडळाकडून मोठ्या प्रमाणात गटबाजी होत आहे म्हणुन आम्ही आमदार आशुतोष काळे यांच्या गटा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे चितळी गावच्या नवनिर्वाचित उपसरपंच कविताताई पगारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोपरगाव विधानसभेचे कर्तव्यदक्ष आ. आशुतोष काळे यांच्या विकासकामांवर चितळी येथील नवनिर्वाचित उपसरपंच सौ.कविताताई सोनाजी पगारे प्रभावित झाल्या यावेळी सोनाजी पगारे,सागरजी पगारे, मंगेश गायकवाड, दत्तात्रय गडवे, संतोष गायकवाड, बाबासाहेब खरात, बबलु पगारे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांच्या सोबत दि.(२५)रोजी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश केला यावेळी आ. काळे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच कविताताई सोनाजी पगारे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार केला व सन्मान करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी दिपक वाघ, सुरेश वाघ, रामराव गायकवाड, सुनील वाघ, अशोक पगारे, राजु माळी, नितीन वाकचौरे, नंदू गायकवाड,रुपेश गायकवाड,चंद्रकांत वाघ, महेंद्र भोसले, मच्छिन्द्र वाघ, संजय वाघ, सतिश गायकवाड सूर्यकांत उदावंत,दर्शन गायकवाड कैलास गायकवाड, अनिल कापसे, महेश गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते.
गावकरी विकास मंडळाकडून मोठ्या प्रमाणात गटबाजी व अडवणूक होत आहे म्हणुन आम्ही आमदार आशुतोष काळे यांच्या गटा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आमदार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चितळी गावचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. :-
नवनिर्वाचित उपसरपंच कविताताई पगारे
0 टिप्पण्या