कालवा निरीक्षकास मारहाण ; श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 

गोंडेगाव येथे कालवा निरीक्षकास मारहाण श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल



गोंडेगाव








:श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसरामध्ये कालवा निरीक्षकास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी श्रीरामपूर येथील तालुका पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील चारी नं. २० मध्ये आरोपी संतोष वेताळ हा जेसीबीच्या साह्याने अनाधिकृतरित्या चारीचे खोदकाम होत असल्याची माहिती कालवा निरिक्षक गणेश विठ्ठल भालेराव यांना मिळाली.त्यावरुन त्यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता चारीचे अनधिकृतपणे खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले.



निरीक्षक भालेराव यांनी संतोष वेताळ यास सदर गोष्टीचा जाब विचारला की, तुम्ही हे खोदकाम कुणाच्या परवानगीने करत आहे.त्यावर संतोष वेताळ हा कालवा निरिक्षक संतोष भालेराव यांना म्हणाला की, तुला काय करायचे आहे ते, कर असे म्हणून त्याने जेसीबी द्वारे होणारे खोदकाम काम बंद केले.काम थांबविले त्यानंतर संतोष वेताळ हा कालवा निरिक्षकाच्या अंगावर धावून गेला. त्यांना गलिच्छ अशी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तुला काय करायचे ते कर असे म्हणून धमकी दिली.

याप्रकरणी कालवा निरिक्षक गणेश भालेराव यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादिवरुन संतोष वेताळ नामक आरोपीच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सतिष गोरे करीत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या