श्रीरामपूर तालुक्यात अनेक प्रस्थापितांना मतदारांनी घरी बसवले,

 

 


श्रीरामपूर तालुक्यातील पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक प्रस्थापितांना मतदारांनी घरी बसवले आहे व गावचा कारभार नवीन कारभाऱ्यांच्या हातात दिलेला आहे.

तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या , 11 ग्रामपंचायत मध्ये रविवारी 5 नोव्हेंबर रोजी मतदान झाले, सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी येथील प्रशासकीय इमारतीत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

 या निवडणुकीमध्ये दत्तनगर ,माळवडगाव शिरसगाव येथे अतिशय चुरशीची व अटीतटीची लढाई होती.

शिरसगाव मध्ये सत्ताधारी मुरकुटे गटाचा दारुण पराभव करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे गणेश मुदगुले यांनी बाजी मारली आहे, तर माळवडगाव येथे ना. विखे पाटील समर्थक बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने व माजी सरपंच बाबासाहेब चिडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला असून तेथे काँग्रेसचे डॉ नितीन आसने यांचा पॅनल विजयी झाला आहे .

बेलापूर ग्रामपंचायतचे पोटनिवडणूक झाली त्यामध्ये सुमारे 50% च्या फरकाने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या गटाने बाजी मारत त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत एकंदरीत तालुक्यामध्ये काँग्रेसने या निवडणुकीमध्ये बहुमत सिद्ध केले आहे.

 

  ग्रामपंचायती – 13

बिनविरोध - 4

निकाल जाहीर -11


भाजप ( ना.राधाकृष्ण विखे )  – 2

मा. आ. भानुदास मुरकुटे ) 3

काँग्रेस – (आमदार लहू कानडे / करण ससाणे ) 8

1) शिरसगाव भाजप  गट

2) कडीत बु भाजप गट

3) माळवाडगाव काँग्रेस गट 

4) नाऊर काँग्रेस गट

5) कन्हेगाव काँग्रेस  गट

6) दिघी काँग्रेस गट

7) दत्तनगर काँग्रेस गट

8) उक्कलगाव काँग्रेस गट 

9) भोकर काँग्रेस गट

10) कान्हेगाव काँग्रेस गट

11) खर्डी बी.आर.एस गट 

12) उंदिरंगाव बी.आर.एस गट 

13) निमगाव बी.आर.एस गट 


बिनविरोध ग्रामपंचायत

1) गुजरवाडी काँग्रेस 

2) गोंधवणी काँग्रेस

3) जाफराबाद भाजप 

4) रामपूर भाजप 


14) बेलापूर बु || ( पोट निवडणुक ) भाजप गट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या