पोलिसांवर गोळीबारसह 29 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार सचिन ताके जेरबंद...

 

 नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई




 श्रीरामपूर : पोलिसांवर गोळीबारास चोरी आणि मंगळसूत्र ओरबडण्याचे तब्बल 29 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार  सचिन ताके याला जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. संगमनेर येथील एका मंगळसूत्र ओरबाडण्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.


 संगमनेर येथील रहिवाशी उषा अशोक लोंगानी (वय 65 वर्षे, रा. शिंदे पाटील बिल्डींग, मेहेर मळा, ता. संगमनेर) या 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 03.00 वा. चे सुमारास त्यांचे नातवाला घेवुन घराकडे जात असतांना पाठीमागुन मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन चोरुन नेले. सदर घटने बाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपासासाठी पथके रवाना केली. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी सचिन ताके (रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर) असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सचिन ताके रा. उंदीरगांव हा तसेच त्याचा आणखी एक साथीदार असे लाल रंगाचे विना क्रमांकाचे बजाज कंपनीचे पल्सर मोटारसायकलवर श्रीगोंदा रोडने चांदनी चौक अहमदनगर या ठिकाणी येणार आहे. पोलीस पथकाने चांदनी चौक अहमदनगर या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील माहितीप्रमाणे दोन इसम एका लाल रंगाचे विना नंबरचे पल्सर मोटारसायकलवर येतांना दिसले. त्यावेळी पथकाने दोन्ही इसमांना खाली उतरणेबाबत कळविले असता मोटारसायकलचे पाठीमागील सिटवर इसम खाली उतरला असता मोटारसायकल चालकाने त्याचे ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात घेवुन निघुन गेला. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव सचिन लक्ष्मण ताके (वय 33 वर्षे, रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याचा साथीदार राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी (रा. श्रीरामपुर) याचेसोबत त्यांचेकडील बजाज कंपनीचे पल्सर मोटारसायकलवर येवुन संगमनेर शहर व राहाता या ठिकाणी गंठण चोरी केल्याचे सांगितले.

आरोपी सचिन लक्ष्मण ताके याचेविरुध्द यापुर्वी अहमदनगर व छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चैन स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे एकुण - 29 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.  

--------


  सोनार उदावंत यास विकले चोरीचे सोने


 आरोपी सचिन ताके याने चोरी केलेले सोन्याचे दागिने विजय पोपट उदावंत (रा. रुई, ता. राहाता) यास विकले असल्याचे सांगितले. ताके याच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीतुन आलेले 4,500/- रुपये मिळुन आल्याने ते ताब्यात घेवुन त्यास संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या