एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

 एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू 

 एकाचे शीर धडा वेगळेसोलापूर :

बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी काल (गुरुवारी) एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून तिनही तरुण गाडी खाली चिरडून जागीच ठार झाले आहेत.

बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. 

यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार झाले. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन तरुणांची नावे आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. 

यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि दुचाकीचा तांदुळवाडी येथे भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचे शीर हे शरीरापासून वेगळे झाले. तर इतर दोघे जवळपास 50 फूटांपर्यंत फरफटत गेले. 

घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांनी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या