शिर्डीत नो मास्क नो दर्शन

 



महसूलमंत्री विखे पाटील यांच्या साईसंस्थानला सुचना


शिर्डी ( प्रतिनिधी )

-जगप्रसिध्द शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क असल्याशिवाय दर्शनासाठी जाता येणार नाही. साईबाबा संस्थानने येणाऱ्या साईभक्तांना मास्क पुरवावे तसेच शिर्डी शहरात नो मास्क नो दर्शन अशा आशयाचे फलक लावण्यात यावे अशा सुचना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थान प्रशासनाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी श्री दत्तजयंती उत्सवाचे औचित्य साधत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी ना.विखे पाटील यांचा साईंबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हूलवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीष दिघे, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, विलास आबा कोते, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, रविंद्र गोंदकर, दत्ता कोते, मधुकर कोते,अजय नागरे,गणेश कोते, आदी मान्यवरांसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी ना विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की,शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी साईंबाबा संस्थानच्या वतीने मास्क पुरविण्यात यावे, शहरात 'नो मास्क नो दर्शन' या आशयाचे जागोजागी फलक लावण्यात यावे यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीने तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात आणी राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली असून बाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.राज्यात जे एनवन व्हेरिएंटचे दहा नवे सक्रिय रुग्ण आढळून आले आहे.

 तर कर्नाटकात या नव्या व्हेरिएंटमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. शिर्डीत सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील लाखो भाविक नाताळच्या सुट्टीत दाखल होत आहेत. 

त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महसूलमंत्री विखे पाटील यांनी साईंबाबा संस्थान प्रशासनाला सुचना केल्या आहेत. शिर्डी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे.



रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपयांचा दंड...

 


धुम्रपान करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकी बहाद्दरांवर नगरपरिषदेच्या पथकाने आतापर्यंत विस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम अजून तीव्र करण्यात येणार असून थुंकणाऱ्यांवर पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार असल्याने आता यापुढे रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर या पथकाचे विशेष लक्ष असणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या