छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातच!

 




ना. विखे पाटील यांची शिवप्रेमी संघटनांशी चर्चा 


श्रीरामपूर : 


गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच व्हावा ही मागणी लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे संकेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.



येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सर्व शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनांची आहे. याबाबत शनिवार दि. 30 डिसेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात शिवप्रेमी संघटना व हिंदुत्ववादी संघटना यांच्यासह ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.


    छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सरचिटणीस, विधानसभा प्रमुख नितीन दिनकर व तालुकाध्यक्ष दिपक (अण्णा) पटारे यांनी भेट घेत सविस्तर माहिती दिली. फडणवीस यांनी त्यांच्याकडील ४ ते ५ खात्यांची ना-हरकत तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यानंतर ना.विखे पाटील यांनी तात्काळ १ कोटी रुपये निधी दिला.


 प्रशासकीय पातळीवरील ११ पैकी १० परवानग्या पुर्ण झाल्या आहेत. त्यातच दि.३० रोजी झालेल्या हिंदुत्ववादी नेते, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ना.विखे पाटील यांनी संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, महावितरण व श्रीरामपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पुतळा उभारणीसाठी लागणाऱ्या बाबींची पुर्तता करण्याचे आदेश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या