Crime : पोलीस ठाण्यातून आरोपीने ठोकली धूम...

पोलिसांनी काही तासातच आवळल्या मुसक्या!वैजापूर : चोरी व वाटमारीच्या प्रकरणातील एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चक्क पोलिस ठाण्यातुन पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास येथे घडला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे पोलिसांची इभ्रत वाचली.‌ मनोज उर्फ भोला काकडे असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली असुन तो शहरातील मोंढा मार्केट भागात राहतो.‌ स्टेशन रस्त्यावर चाकुचा धाक दाखवत एकाला लुटल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास त्याने ठाण्याच्या भिंतीवरुन उडी मारुन धुम ठोकल्याने खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन काही वेळातच आरोपीला धरण परिसरात ताब्यात घेतले व ठाण्यात आणले.‌ या प्रकाराबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळल्याने दिसुन आले.‌ आरोपीची प्रकृती ठिक असुन तो ताब्यात असल्याचे पोलिसातर्फे सांगण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या