दादा सोनवणे l राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा / ;- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा श्रीगोंद्यात दोन अल्पवयीन मुलीवर एका मुलीच्या साह्याने दोघांनी बलात्कार केल्यापरकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीनपैकी दोघांना जेरबंद केले असून मदत करणारी मुलगी फरार झाली आहे. पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत मात्र या प्रकारामुळे श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याकडे अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी या ठिकाणी एकतर्फी प्रेमातून मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार झाल्याची घटना ताजी असताना श्रीगोंद्यात रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी दोघीच्या आईच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुली श्रीगोंद्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ११मध्ये शिकत होत्या. विद्यालयाच्या वसतिगृहात राहताना त्याची दौड तालुक्यातील शिरापूर येथील अल्पवयीन मुलीशी मैत्री झाली होती. त्या मैत्रीतून त्या दोघीची फसवणूक करण्यात आली. त्यानुसार दोन्ही पीडितेच्या आईच्या दोन्ही फिर्यादी वरून सोहेल रियाज जकाते, जिशान कलीम जकाते (रा जकातेवस्ती श्रीगोंदा) व शिरापूर ता दौंड येथील अल्पवयीन मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे आहे.
दोन्ही फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा शहर नजीक जकातेवस्ती येथे राहणाऱ्या सोहेल रियाज जकाते, जिशान कलीम जकाते यांनी त्याच्या दोन्ही मुलीशी शिरापूर ता दौंड येथील अल्पवयीन मुलगी हिच्या माध्यमातून मैत्री करून एकीला श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पीडित मुलगी तिची मैत्रीण शिरापूर ता दौंड येथील अल्पवयीन मुलगी हि पुणे जिल्ह्यातील यवत जवळील भुलेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी व फिरण्यासाठी गेले होते. तर दुसऱ्या पिडीतेला श्रीगोंदा - काष्ठी रोडवरील हॉटेल बार्बीक्यू मध्ये ओळख करून दिली. मराठी कट्टा येथे नेवून त्यावेळेस त्या ठिकाणी पहिल्या फिर्यादीत ग्रे रंगाची एर्टिगा घेऊन सोहेल रियाज जकाते हा तेथे आला तर दुसऱ्या फिर्यादीत केसरी रंगाची केटीएम मोटारसायकल वर आरोपी घटनास्थळी आला. त्यावेळी दोन्ही आरोपीला शिरापूर ता दौंड येथील अल्पवयीन मुलीने अल्पवयीन पीडितेला सांगितले कि त्याला तुझ्यासोबत चांगली ओळख करायची आहे. त्यामुळे दोघांना मी इकडे आणले आहे, असे सांगितले. पीडितेला याचा राग आला ती तिच्यावर ओरडली त्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत बसले. नंतर त्यांनी एकमेकांच्या सोबत फोटो काढले. त्या फोटोत पीडित मुलींना पण घेतले नंतर घरी आल्यावर सोहेल रियाज जकाते याचा अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर फोन आला. शिरापूर ता दौंड येथील अल्पवयीन मुलीने बोलण्यास विनंती केली आणि भेटायला बोलावले त्यावर नकार देताच त्यावेळी भुलेश्वर येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. अशा धमक्या सारख्या देऊ लागला त्यानंतर दोन्ही पीडितेला दोघांनी वेगवेगळ्या वेळी पेडगाव रोडवरील हॉटेल नक्षत्र व लॉजिंग या ठिकाणी घेऊन गेला. खोलीत गेल्यावर खिशातून चाकू काढून ठार मारण्याची धमकी देत दोघीवर बळजबरीने बलात्कार केला. त्यावेळी त्याचे नग्न अवस्थेतील फोटोग्राफ काढले व घडलेली घटना कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली व वसतिगृहाच्या गेटवर नेउन सोडले.
त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी करू लागले. त्यावेळी दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींनी ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानुसार दोघीच्या आईच्या फिर्यादीनुसार सोहेल रियाज जकाते व जिशान कलीम जकात रा जकातेवस्ती श्रीगोंदा व शिरापूर ता दौंड येथील अल्पवयीन मुलगी याच्यावर भादंवि ३७६,३७६(२)(j) बालकाचे लैगिक अपराधापासून सौरक्षण अधिनियम २०१२ नुसार ४,११,१२,१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत.
पोलिसांनी सोहेल रियाज जकाते व जिशान कलीम जकात रा जकातेवस्ती श्रीगोंदा यांना ताब्यात घेतले असून तिसरी आरोपी अल्पवयीन मुलगी फरार झाली असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी वाढू शकतात ?
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे वॉडर्न, सिक्युरिटी तसेच नक्षत्र लॉजिंगचे मालक अथवा मॅनेजर तसेच सदर गुन्ह्यात मदत करणारे आरोपी होऊ शकतात, असेही पोलिसांनी सांगितले आहे
तालुक्यातील दोन्ही महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षण घेणाऱ्या मुलापेक्षा इतर मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यामुळे महाविद्यालयाच्या तसेच वसतिगृहाच्या परिसरात ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिल्यास या मोकार फिरणाऱ्यावर अंकुश ठेवता येईल असेही अनेक पालकांचे मत आहे
श्रीगोंदा महाविद्यालय तसेच वसतिगृहाच्या परिसरात बिनकामाच्या लोकांचा मुलाचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच मुलींना येता - जाताना रोडरोमिओ यांचा मोठा त्रास होताना दिसत आहे त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 टिप्पण्या