Crime : घरमालकाचा भाडेकरू विवाहितेवर बलात्कार..!

 


घरमालकाने विवाहित भाडेकरू महिलेचा पती घरी नसताना तिच्यावर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्यास धमकी दिली. महिलेला वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. त्यामुळे महिलेने पती घरी आल्यानंतर याबाबत चर्चा केली. राज्याची उपराजधानी आणि जिथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्या नागपूर मध्ये ही धक्कादायक घटना घडली.


पतीच्या निर्णयानंतर यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महेश नामदेव घोगरे (२९, यशोधरानगर) याला अटक केली. पीडित ३० वर्षीय महिला गृहिणी असून तिला दोन मुले आहे. तिचा पती खासगी नोकरी करीत असून तो वारंवार बाहेरगावी मुक्कामी असतो. याच संधीचा फायदा घेऊन घरमालक महेश घोगरेने तिच्याशी संबंध वाढवले. तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी संपर्कात राहायला लागला. त्याने तिला अनेकदा शारीरिक संबंधाची मागणी केली.


मात्र, तिने प्रत्येक वेळी नकार दिला. महिलेने घरमालकाच्या त्रासाला कंटाळून घर बदलण्याचा निर्णय घेतला. १७ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता महिला घरात एकटी होती. महेशने घरात प्रवेश केला आणि तिला बळबजरी शारीरिक संबंधाची मागणी करीत होती. त्यावेळी त्याने महिलेची पतीकडे बदनामी करण्याची धमकी दिली. महेशने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. त्यानंतर तो तिला वारंवार शारीरिक संबंधासाठी तगादा लावत होता. गावावरून पती परत आल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. पतीने तिला धीर दिला आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यात नेले. तेथे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या