Maratha Resurrection : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना कोपरगावातून लंगोट बांधून प्रतिआव्हान..!

 


कोपरगाव : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्रासाठी लंगोट बांधावे असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देत कोपरगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्या विनय भगत यांनी शुक्रवारी (दि.८ डिसेंबर) लंगोट बांधून प्रतिआव्हान दिले. 'शेंडगे आम्ही बांधला लंगोट, आता द्या कुणबी असल्याचे प्रमाणपत्र' असे असे भगत यांनी म्हटले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.

आठ दिवसांत चासनळी, वेळापूर, माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख या गावांच्या मराठा बांधव व भगिनींनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.


दरम्यान काल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्रासाठी लंगोट बांधावे असे विधान केले होते. त्याच अनुषंगाने येथील आंदोलनकर्ते विनय भगत यांनी चक्क लंगोट बांधला. त्यानंतर त्यांनी शेंडगे यांना आव्हान देत, आम्ही लंगोट बांधला आता, आम्हाला कुणबी असल्याचे व ओबीसी असल्याचे प्रमाणपत्र द्या, अशी दंड थोपटून मागणी केली. यावेळी अनिल गायकवाड, विकास आढाव, रवी कथले, अशोक आव्हाटे, प्रमोद नरोडे, दीपक वाजे, अमित आढाव, राजेंद्र दवंगे, साई नरोडे, रुपेश सिनगर, लक्ष्मण सताळे, बालाजी गोर्डे, सुनील साळूंखे, अमोल लोखंडे, सचिन आढाव, पप्पू वाबळे आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या