Murder: अनैतिक संबंधातून जावयाने केला सासर्‍याचा खून
पोलिसांनी जावई, साथीदार व पत्नीला केले अटक

संगमनेर: अनैतिक सबंधातून जावयाने व त्याच्या साथीदाराने सासर्‍याचा गळा आवळूून खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात घडली. गोरख दशरथ बर्डे वय (53 रा. मिरपूर लोहारे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांब शिवारातील वनविभागाच्या जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर  संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे घारगावचे पो. नि. संतोष खेडकर, प्रमोद गाडेकर व सुभाष बोडके यांनी घटनास्थळी जात मयताची  ओळख पटविली. यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर जि. पुणे आणि विलास पवार रा. (पेमदरा, ता. जुन्नर, जि. पुणे) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी खुनाची कबुली दिली. 

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने जावयाने आणि त्याच्या साथीदाराने साकुर जवळील माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नातील वरातीसाठी सासर्‍याला बोलावून घेत त्याचा तेथेच धारदार शस्त्राने गळ्यावर जखमा करत त्याचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी रणखांब येथील वनविभागाच्या जंगलात नेत त्याचा चेहरा ज्वलनशील पदार्थ टाकून अर्धवट जाळला असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले आहे.  

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या