राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत निलंबित!

 


मालेगाव येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका !!
तात्काळ निलंबित करण्याचे अवर सचिव संजीव राणे यांचे आदेश !!



राहुरी : 
  राहुरीचे तहसिलदार चंद्रजित राजपूत यांना मालेगाव येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेऊन महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना निलंबित केल्यामुळे महसूल खात्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या राहुरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले चंद्रजीत राजपूत यापूर्वी मालेगाव जिल्हा नाशिक येथे कार्यरत होते तेथेही त्यांची कारकीर्द निराशा जनक ठरली होती तहसीलदार राजपूत राहुरी येथे हजर झाल्यानंतर राहुरी तालुक्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार यांच्यासमोर ठाण मांडून बसावे लागले होते.

     शासनाने काढलेल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे कि, चंद्रजित राजपूत तत्कालीन तहसिलदार, मालेगांव, जि.नाशिक सध्या तहसिलदार, राहुरी, जि. अहमदनगर यांनी जून ते ऑक्टोंबर, २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात केलेल्या अनियमितता करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. चंद्रजित राजपुत, तहसिलदार मालेगांव सध्या तहसिलदार, राहुरी, जि. अहमदनगर यांच्याविरुध्द शासन ज्ञापन दि.२०/११/२०२३ अन्वये म.ना.से (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ व १२ अन्वये विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे.त्या अर्थी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन  चंद्रजित राजपुत यांना तात्काळ प्रभावाने शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश शासनाने काढलेले असून शासन त्या आदेशात पुढे म्हटले आहे की प्रस्तुत आदेश अंमलात असे पर्यंत श्री. राजपुत, यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये. तसेच श्री. राजपुत, यांना त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्यासंबंधी खालील आदेश देण्यात येत आहेत. निलंबनाच्या कालावधीत श्री. राजपुत यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये. (त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल) व तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील. निलंबनाच्या कालावधीत त्यांना निलंबन भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या प्रत्येक वेळी आपण खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही खाजगी धंदा वा व्यापार करीत नाही अशा त-हेचे प्रमाणपत्र श्री. चंद्रजित राजपुत यांना द्यावे लागेल.
महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ६८ मधील तरतुदीनुसार श्री. चंद्रजित राजपुत यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या