महायुती मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ....

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर नगर जिल्ह्याची जबाबदारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी केली मेळाव्याची जय्यत तयारी


 नगर : 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दि १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून, महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत. महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यातील ३६जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता.त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ सुजय विखे पाटील आणि आ.संग्राम जगताप यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधला.या मेळाव्यास महायुतीतील घटक जय्यत तयारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नगर शहरातील बंधन लाॅन्समध्ये सकाळी ११वाजता जिल्ह्याचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.


महामेळाव्याच्या निमिताने मंत्री विखे पाटील आणि आ.संग्राम जगताप यांनी महावेळाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार करतानाच राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवून महायुती काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 पालकमंत्री विखे पाटील यांच्या नगर आणि श्रीरामपूर येथे घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेवून महामेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या रविवारच्या मेळाव्यात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगून महायुती मध्ये चांगला समन्वय असल्याचे खा.विखे पाटील आणि संग्राम जगताप यांनी सांगितले. आ.जगताप म्हणाले की,राज्यातून लोकसभा निवडणुकीत ४५ जागा विजयी करण्याचा निर्धार करतानाच यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचे याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले उतर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.कोणत्या नेत्यावर कुठली जबाबदारी...

अहमदनगर : राधाकृष्ण विखे-पाटील (कॅबिनेटमंत्री)
नागपूर : श्रीमती चित्रा वाघ (भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा), जयदीप कवाडे (रिपब्लिकन पक्ष कवाडे गट)
छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (कॅबिनेटमंत्री)
गडचिरोली : सुबोध मोहिते (माजी केंद्रीयमंत्री)
अकोला : प्रवीण दरेकर (गटनेते भाजप, विधान परिषद)
सोलापूर : चंद्रकांत पाटील (कॅबिनेटमंत्री)
अमरावती : बच्चू कडू (माजी मंत्री), अनिल बोंडे (खासदार), रवी राणा (आमदार)
पुणे : रामराजे नाईक-निंबाळकर (माजी सभापती, विधान परिषद), आमदार प्रसाद लाड (समन्वयक महायुती)
भंडारा : विजयकुमार गावित (कॅबिनेटमंत्री)
धुळे : गिरीश महाजन (कॅबिनेटमंत्री)
लातूर : संभाजी निलंगेकर-पाटील (माजी मंत्री)
धाराशिव : तानाजी सावंत (कॅबिनेटमंत्री)
परभणी : संजय बनसोडे (कॅबिनेटमंत्री)
पालघर : रवींद्र चव्हाण (कॅबिनेटमंत्री), हितेंद्र ठाकूर (अध्यक्ष- बहुजन विकास आघाडी)
सिंधुदुर्ग : आदिती तटकरे (कॅबिनेटमंत्री)
हिंगोली : अब्दुल सत्तार (कॅबिनेटमंत्री)
मुंबई : दीपक केसरकर (कॅबिनेटमंत्री), आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), राहुल शेवाळे (खासदार, शिंदे गट), अविनाश महातेकर (माजी मंत्री,
रिपाइं आठवले गट), सचिन खरात (रिपाइं खरात गट), सिद्धार्थ कासारे (रिपाइं आठवले गट)
कोल्हापूर : हसन मुश्रीफ (कॅबिनेटमंत्री)
बीड : धनंजय मुंडे (कॅबिनेटमंत्री), तानाजीराव शिंदे (शिवसंग्राम)
सातारा : शंभूराज देसाई (कॅबिनेटमंत्री)
ठाणे : श्रीकांत शिंदे (खासदार)
मुंबई उपनगर : आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), छगन भुजबळ (कॅबिनेटमंत्री), गजानन कीर्तीकर (खासदार), रामदास कदम (माजी मंत्री)
गोंदिया : धर्मरावबाबा अत्राम (कॅबिनेटमंत्री)
नंदुरबार : अनिल भाईदास पाटील (कॅबिनेटमंत्री)
वर्धा : दीपक सावंत (माजी मंत्री)
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेटमंत्री)
जालना : अतुल सावे (कॅबिनेटमंत्री)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या