१४ जानेवारी हा दिवस मोठया सणासारखा साजरा करा : कुणाल सरोदे

 
--


१४ जानेवारी हा दिवस मोठया सणासारखा साजरा करा : कुणाल सरोदे

पुणे / श्रीगोंदा :

भेकराईनगर येथे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त १२ हजार मोतीचुर लाडू वाटण्याचा कार्यकम करण्यात आला. असा कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच कुणाल सरोदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कुणाल सरोदे यांनी, राज्यासह संपूर्ण देशात १४ जानेवारी विद्यापीठ नामविस्तार दिन हा दिवस मोठया सणासारखा साजरा झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे.
                                                       पुणे येथील भेकराईनगर या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त १२ हजार मोतीचूर लाडू वाटण्याचा कार्यकम करण्यात आला.या कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विशेष उपस्थिती लावली आणि आयोजकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

अजिक्य धुमाळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद सरवदे यांनी सुध्दा कार्यक्रमास हजेरी शुभच्छा दिल्या. यावेळी कुणालभाव सरोदे यांनी हा दिवस मोठया सणासारखा साजरा करावा असे समाजाला आवाहन केले. त्यावेळी बोलताना सरोदे म्हणाले की, १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद' असा नामविस्तार करण्यात आला.1994 रोजी नांदेडच्या एका जाहीर सभेत बोलताना एका राजकीय नेत्याने ‘भाकरीचे पीठही ज्यांना मिळत नाही त्यांना विद्यापीठ कशाला?’ असं वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोडं फुटले होते. हे वक्तव्य कुणालाच अपेक्षित नव्हतं जेव्हा शरद पवारांनी नामांतराची घोषणा केली तेव्हा त्याला खरी वाचा फुटली. पुढे शरद पवारांनी तोडगा काढत औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देत नामविस्तार केला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषभ रणदिवे यानी तर प्रास्ताविक प्रफुल सरोदे यांनी केले. अमोल मोरे यानी आभार प्रदर्शन केले. 


या कार्यक्रमाला एक हजार कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमास सचिन भदरगे,सुशीलमुंडे, विजय डोळसे, निलेश शेट्टे , बबलू तांगडे, बबलू कांबळे,शैलेश घोडके, योगेश कदम, गणेश कदम , विशाल शर्मा, राखी सरोदे, सीमाताई सावंग,रतन सरोदे,कोमल सरोदे, अनिता सरोदे,सविता रणदिवे,मनीषा अमोल मोरे,प्रणिता सरोदे, रतन सरोदे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या