श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील स्वस्तात सोने देण्याच्या प्रकरणातील अनेक गुन्ह्यात आरोपी कुटूंबातील मुलानेच दारूच्या नशेत पित्यासह भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले असून याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
श्रीगोंदा तालुक्यात मुलानेच भावासह पित्याचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सुरेगाव येथील आदिवासी समाजातील घडयाळ हिरामण चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. दौंड तालुकासह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूट केल्याप्रकरणी अनेकदा त्याच्या कुटुंबातील सदस्य यांची नावे समोर आली होती. त्यातच त्याच्या घरातील वादामुळे घड्याळ याची सून नांदत नव्हती. त्यामुळे दि १८ जानेवारी रोजी त्याचा मुलगा जावेद घड्याळ चव्हाण हा दारू पिऊन त्याची नांदत नसलेली पत्नी आणण्यासाठी पिता घड्याळ चव्हाण यांचेकडे पत्नीला आणण्यासाठी पैश्याची मागणी करु लागला.
मात्र पिता कोणत्याही परिस्थितीत पैसे देत नसल्याने त्यांची भांडणे सुरू झाली. या भांडणात आरोपीचा भाऊ महावीर घड्याळ चव्हाण मध्यस्थी करण्यासाठी गेल्यावर जावेद घड्याळ चव्हाण याने त्याच्या जवळील चाकू महावीर घड्याळ चव्हाण यांच्या पोटात खुपसून जीवे मारले. तसेच हे पाहून मुलाला वाचविण्यासाठी पिता घड्याळ हिरामण चव्हाण हे गेले असता त्याच्याही पोटात सूरा खुपसून खून केला. खून तो घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत अहमदनगर गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळताच त्यांनी तांत्रिक माहिती मिळवून आरोपीला अवघ्या काही तासातच आरोपी जेरबंद केले. त्यास बेलवंडी पोलिसांच्या स्वाधीन करून त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
0 टिप्पण्या