राहुरी तालुक्यात वकील दांपत्याचा खून....

खून करून मृतदेह फेकले विहिरीत....




राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील दांपत्य राजाराम आढाव व मनीषा आढाव यांचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. 

गुरुवारी 25 जानेवारी रोजी त्यांचे अपहरण झाले होते. शुक्रवारी राहुरी तालुक्यातीलच उंबरे गावातील स्मशानभूमी मधील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. 




पोलीस पाटलाने याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. 

आढाव दांपत्याचा खून कोणी व का केला? याबाबत राहुरी तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे. 

मानोरी ते उंबरे हे सुमारे 15 ते 16 किलोमीटरचे अंतर आहे. उंबरे परिसरातच त्यांचे मृतदेह का टाकले? याबाबतही पोलीस तपास करत आहेत. 


पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या