...तरी शिरूर शहराध्यक्ष पद रिक्तच

 शिरूर शहर भाजप अध्यक्ष पदासाठी मुलाखती होऊन चार महिने उलटले तरी शिरूर शहराध्यक्ष पद रिक्तच


मितेश गादीया यांचे नाव चर्चेत.......



शिरूर 


शहर भाजपा अध्यक्षपदासाठी मुलाखती होऊन ४ महिने उलटले तरी शिरूर शहराध्यक्ष पदी निवड झाली नाही. ५ महिन्या पूर्वी शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पदी आबा सोनवणे यांची निवड झाली. त्यानंतर शिरूर शहराध्यक्ष पदा साठी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष शरद बुटे , निवडणुक प्रभारी राजेश‌ पांडे ,प्रदीप कंद, राहुल पाचर्णे   यांच्या मार्गदर्शनखाली मुलाखती घेण्यात आल्या. शिरूर शहर अध्यक्ष पदा साठी भारतीय जनता पार्टी शिरूर शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे,कार्याध्यक्ष मितेश गादिया, गणेश पाचर्णे, माजी शहर अध्यक्ष केशव लोखंडे ह्यांनी मुलाखती दिल्या.


 मितेश गादिया हे ह्या पूर्वी २ वेळा अध्यक्ष पदा साठी इच्छुक होते पण दोन्ही वेळेस त्यांना डावलण्यात आले. पहिल्या वेळेस केशव लोखंडे ह्यांना पद देण्यात आले व दुसऱ्या वेळेस नितीन पाचर्णे यांना  शहराध्यक्ष कऱण्यात आले. मितेश गादिया ह्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज पर्यंत अनेक लहान मोठे कार्यक्रम घतले.


 तसेच त्यांच्या जवळ कोणता ही कार्यकर्ता एखादा काम घेऊन गेला तर तो कधीच रिकाम्या हाताने परत आला नाही. मितेश गादिया ह्यांचे काम पाहून शिरूर शहारातील सुमारे ३५ पदाधिकाऱ्यांनी शिरूर शहर अध्यक्षपदी मितेश गादिया यांची निवड करण्यात यावी ह्यासाठी सरचिटणीस नवनाथ जाधव ह्यांच्या लेटर वर सह्या करून पत्र जिल्हा अध्यक्ष शरद बुटे पाटील, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे,आबा सोनवणे, प्रदीप कंद ह्यांना देण्यात आले आहे. गेल्या ४ महिन्या पासून भाजपचे काम शिरुर‌शहरात आजिबात दिसुन येत नाही आता यावेळी शिरुर शहराध्यक्षपदी तालुकाध्यक्ष कोणाची नियुक्ती करतात हे पहाणे गरजचे आहे?

मितेश गादिया हे अल्पसंख्याक असल्याने त्यांना पुन्हा डावलण्यात येणार की काय आशी चर्चा शिरुर शहर व बाजार पेठेत होत आहे. या अगोदर पाचर्णे यांच्या घरामध्ये विधानसभा, जिल्हा परिषद तसेच शिरुर नगरपरिषद अशा विविध व भारदस्त पदांसाठी तिकिटे देण्यात आली होती पन आमदारकी आणि जिल्हापरिषद निवडणुकीत त्यांना काही यश आलेले नाही. 


सध्या पाचर्णे यांच्या घरात नगर सेवक, शहराध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती तसेच सरपंच अशी पदे आहेत. तर बाबुराव पाचंगे याच्याकडे शिरुर तालुका संपर्क प्रमुख ही जबाबदारी होती पण त्यांची फारशी कामगिरी दिसून आली नाही. माजी शहराध्यक्ष लोखंडे यांचे देखील कार्य गेल्या चार वर्षांपासून फारसे दिसून येत नाही. आता या वेळी तालुकाध्यक्ष आबा सोनवणे हे शहराध्यक्ष या पदी कार्यदक्ष कार्यकर्त्याची निवड करतील की पुन्हा हे पद पाचर्णे यांच्याच घरात जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या