नगर अर्बन बँकेचे माजी संचालक कटारिया ताब्यात

 माजी संचालक अशोक कटारिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात 



नगर

अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातली अग्रणी बँक असलेली नगर अर्बन बँक या बँकेच्या कर्ज वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप बँक बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आला होता.

दरम्यान, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार या बँकेचे माजी संचालक अशोक कटारिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर नगर अर्बन बँक कर्ज वाटप घोटाळ्यातल्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

नगर अर्बन बँक कर्ज वाटप प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा झाला. त्याबद्दल बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष आणि या बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला सध्या प्रचंड यश येत आहे.

आतापर्यंत पोलिसांनी या बँकेचे कर्मचारी संजय लुणिया प्रदीप पाटील, माजी संचालक साठे आणि  कोठारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. थेट बँकेच्या संचालकांनाच अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केल्यानं सभासद आणि ठेवीदारांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या