श्रीरामपुरात व्यापाऱ्यावर जीएसटीचा छापा..!

दिवसभर गोपनीय पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी...


 श्रीरामपूर शहरातील विद्याश्री ट्रेडिंग कंपनी या दुकानावर जीएसटी विभागाने छापा टाकल्याचे समजते. मंगळवारी दिवसभर या दुकानाची तसेच दुकानाचे मालक धाडीवाल यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची पडताळणी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. छाप्याबद्दल श्रीरामपूर शहरात मात्र संदिग्ध माहिती होती. अहमदनगर येथील जीएसटी व आयकर विभागाला देखील या छाप्याबद्दल माहिती नसल्याचे समजते. धाडीवाल किराणा मालाचे होलसेल व किरकोळ विक्रेते असून गायछाप तंबाखूचे ते घाऊक विक्रेते आहेत. 

यापूर्वी देखील दोन व्यापाऱ्यांवर श्रीरामपुरात याच पद्धतीने छापे टाकण्यात आले. कारवाईची माहिती मात्र गोपनीय ठेवण्यात आली. त्यामुळे अशा छाप्याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम असतो. आता हा छापा नेमका कोणत्या खात्याचा जीएसटी की आयकर विभागाचा? याबाबत शहरात तर्कवितर्क लावण्यात येत आहत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या