वकील दाम्पत्याच्या खूनाचा श्रीरामपूरात निषेध साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस वकील संघाचे प्रशासनाला निवेदन

 वकील दाम्पत्याच्या खूनाचा श्रीरामपूरात निषेध
साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस
वकील संघाचे प्रशासनाला निवेदन
श्रीरामपूर : राहुरी तालुक्यातील मानोरीच्या वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा श्रीरामपूर वकील संघाने निषेध केला असून
आज साखळी उपोषणाचा तिसरा दिवस असून 3 फेब्रुवारी पर्यंत उपोषण करण्यात येणार आहे. 
याबाबत महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात श्रीरामपूर वकील संघाच्या पदाधिकाºयांनी म्हटले आहे, की राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अ‍ॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याचा अत्यंत निर्घृनपणे खून करण्यात आला. यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्यात यावा. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्टÑातील वकील बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर वकील संरक्षण अधिनियम कायदा मंजूर करण्यात येऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन काउन्सील आॅफ महाराष्टÑ व गोवा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. श्रीरामपूर महसूल विभागातर्फे नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी निवेदन स्वीकारले. दरम्यान श्रीरामपूर वकील संघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. 3 फेब्रुवारी पर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे वकील संघाकडून माहिती मिळाली त्यामुळे कोर्टाचे कामकाज वकील संघाने बंद ठेवले आहे व असहकार पुकारला आहे.
---------

श्रीरामपूर : नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना निवेदन देताना श्रीरामपूर वकील संघाचे सदस्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या