गॅस टँकर पलटी झाल्याने हायकोर्ट परिसर सील

 




छत्रपती संभाजी नगरमध्ये टँकर उलटल्याने गॅस लिक झाल्याची घटना घडली. पहाटे पाच दरम्यान छत्रपती संभाजी नगर येथून जालन्याला जाणाऱ्या गॅस टँकरचा पुला जवळ अपघात झाला, त्यामुळे टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस लिक होऊ लागली आहे.

  अतिरिक्त खबरदारी घेत प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंचे वाहतूक बंद केली असून, स्ट्रीट लाईट देखील बंद ठेवण्यात आले आहे.

आसपासच्या परिसरात गॅसची दुर्गंधी पसरल्याने परिसरात अनाउन्समेंट करून याबाबत दक्षतेची माहिती देण्यात येत आहे. परिसरातील जवळपास पाच किलोमीटरपर्यंत गॅस गळतीचा परिणाम दिसून येत आहे.
त्याचबरोबर जालना रोडवरील सिडको चौक ते हायकोर्ट सिग्नल पर्यंतचे वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. 

नागरिकांनी आपल्या घरातील घरगुती गॅस लाईट शेगडी हे देखील बंद ठेवावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. परिसरातील पाच किलोमीटर पर्यंत लाईट, मोबाईल टॉवर, रस्ते बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत 60 ते 70 टँकर पाण्याचा मारा करण्यात आला आहे.


 सध्या अग्निशमन दलाचे जवान गॅस गळती रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरातून जालना रोड गेला असल्याने शहरातील सिडको परिसरात नेहमी मोठी वर्दळ असते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हॉटेल रामगिरी समोर एचपी गॅस कंपनीचा गॅस वाहून नेणारा टँकर अनियंत्रित होऊन उलटला. 

 टँकर मधून मोठी वायुगळती सुरू झाली. परिसरात उग्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या