शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

 शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात 

तिघांचा मृत्यू



वैजापूर :

शिर्डी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा शुक्रवार दि 9 राजी रात्री 11 दरम्यान घडलेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना समृद्धी महामार्गावरील सुरक्षा यंत्रणा तसेच महामार्ग पोलिस व स्थानिकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात वैजापूर येथे दाखल करत प्राथमिक उपचार करुन त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जाफ्राबाद तालुक्यातील हलके तपवन येथील पाच जण स्विफ्ट कार क्रमांक MH 21 BF 9248 ने शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान त्यांचे भरधाव वेगाने जाणारे वाहन धोत्रा शिवारात ट्रक क्रमांक MH 46 AF 9833 ला पाठीमागून धडकला हा अपघात समृद्धी महामार्गावरील चँनल क्रमांक ५०४ वर घडला. 

त्यात तिघांचा मृत्यू झाला तर रविंद्र मन्सुरराव फलके व आणखी एक (नाव समजू शकलेले नाही) असे दोघेजण  गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पथकाने उपचार केले.

वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात संजय बोरनारे, रणजीत चव्हाण, महेश बुनगे, कमलेश आंबेकर, अमोल बोरनारे, आदीने मदत केली.तर घटनास्थळी महामार्ग पोलिस उपनिरीक्षक विशाल सनद,उपनिरीक्षक बाळकृष्ण ठोंबरे,हेड कॉन्स्टेबल सुनील पोपलघट पोलीस हवालदार बर्फ सागर डोईफोडे व महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी मदतकरू केले, व अपघात ग्रस्त वाहनांना बाजूला करत वाहतूक सुरळीत केली,घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोळी यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली अपघातातील तिघांचे मृतदेह हे कोपरगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या