राज्यसभेसाठी अविनाश आदिक यांच्या नावाची चर्चा

 


श्रीरामपूर- 


राज्यसभेसाठी सध्या राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये जागावाटप झालेले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या जागेसाठी अविनाश आदिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.


अविनाश आदिक हे माजी मंत्री गोविंदराव आदिक यांचे चिरंजीव असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते आहेत. त्यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर संधी मिळू शकते.


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. एका राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याने मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बैठकीत उमेदवारी अर्जावर आज केवळ सूचक म्हणून आठ आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या.


 उद्या (14 फेब्रुवारी) पुन्हा एकदा पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार आहे. अजित पवार गटातून राज्यसभेसाठी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश अदिक, इद्रिस नायकवडी, माजी मंत्री नवाब मलिक तसेच नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या बाबा सिद्दिकी यांच्यासह आणखी 3 जण इच्छूक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या