श्रीगोंदा -
श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी येथील उच्चशिक्षित तरुणाने तालुक्यातील भानगाव येथील उच्चशिक्षित मुलीशी देवाची आळंदी या ठिकाणी आंतरजातीय प्रेम विवाह केला. मात्र काही दिवसानानंतर प्रेमविवाह केल्याची माहिती नातेवाईकांना कळताच हे प्रकरण मिटविण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या दालनात बैठक सुरु असताना मुलीने दबावापोटी सासरी जाण्यास नकार दिल्याने, पती विकास थोरात याने खिशातून विषारी औषध काढून ते प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसह सर्वाचीच चांगलीच धांदल उडाली आहे. त्यांस उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चोराचीवाडी येथील उच्चशिक्षित विकास जयसिंग थोरात या तरुणाचे भानगाव येथील परंतु सध्या श्रीगोंदा शहरानजीक शेंडगेवाडी येथील उच्चशिक्षित भारती भानुदास आघाव या तरुणीशी दि २८डिसेंबर २३ रोजी देवाची आळंदी येथील वीरेन मंगल कार्यालयात चोरून प्रेमविवाह केला होता.
लग्नानंतर बहिणीच्या बाळंतपणासाठी ती आई वडिलांकडे गेली होती. यादरम्यान घरच्यांना लग्नाबाबत कुणकुण लागली घरच्यांनी तिला मारहाण दमदाटी करत तुला आणि तुझ्या नवऱ्यास ठार मारण्याची धमकी देऊ असा दबाव निर्माण करून सासरी जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर ३० जानेवारी रोजी पती विकास जयसिंग थोरात याने वकील महेंद्र दादासाहेब थोरात रा डिक्सळ ता कर्जत याचे मार्फ़त श्रीगोंदा पोलिसात पत्नीस नांदण्यास पाठवत नाहीत म्हणूंन तक्रारी अर्ज दाखल केला.
त्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ चे सुमारास पोलीस निरीक्षक यांच्या कॅबीनमध्ये चर्चा चालु असतांना मुलगा विकास जयसिंग थोरात यांच्या सोबत भारती भानुदास आघाव हिने लग्न करूनही अवघ्या १ महिन्यातच सोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिच्या आई- वडीलांकडे जाण्याचे सांगितले. तेव्हा विकास थोरात हा समोरील खुर्चीवर बसलेला होता.त्यावेळी विकास यास आपल्या पत्नीने आपल्याला दगा दिल्याचा मोठा अपमान वाटला. म्हणून त्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातुन 'मॉर्टिन' हे डास मारण्याचे विषारी औषध प्राशन करून खालील पडला. तेव्हा त्यांस पोसई समीर अभंग यांच्या सोबत पोलीस कर्मचारी यांनी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे पोकॉ देवकाते यांच्या मदतीने औषधोपचार करीता रवाना केले.मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यास न्यू मेडिकेयर हॉस्पिटल या खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात असून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
पोलीस निरीक्षकाच्या दालनात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भा.दं. वि कलम 309 प्रमाणे विकास जयसिंग थोरात रा, चोराचीवाडी ता, श्रीगोंदा यांचेवर सरकारतर्फे संभाजी गर्जे यानिफिर्याद दाखल करण्यात केली आहे.या घटनेचा पुढील तपास सपोनी समीर अभंग हे करत आहेत .
0 टिप्पण्या