गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दारात काळ्या बोकडाचा बळी..!

 पोलीस निरीक्षकासह सहाय्यक फौजदाराचे निलंबन...



 गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चक्क पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदाराने पोलीस ठाण्याच्या गेटवरच काळ्या बोकडाचा बळी दिला. पोलिसांच्या या अंधश्रद्धेची राज्यात चांगलीच चर्चा झाली. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करतानाच आठ पोलिसांच्या मुख्यालयात बदल्या केल्या. 

लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकार घडला होता. पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपाधीक्षक दिलीप भागवत यांनी चौकशी करून अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सुपूर्द केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. बोकडाचा बळी देण्याच्या प्रकरणात त्यांची साथ देणारे पोलीस कर्मचारी बालाजी घोराळे, प्रताप माने, मुबारक मुल्ला, शिवप्रसाद रंगवाळ, माधव केंद्रे, गणेश मिटकरी, बाळासाहेब गडदे, नजीर बागवान यांची तडका फडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या