धक्कादायक ! पोलीस ठाण्यात गोळीबार, शिवसेना नेत्यावर भाजप आमदाराकडून जीवघेणा हल्ला

 

धक्कादायक ! पोलीस ठाण्यात गोळीबार

शिवसेना नेत्यावर भाजप आमदाराकडून जीवघेणा हल्ला



मुंबई :


मुंबईच्या उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आ. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. यात महेश गायकवाड यांना ४ गोळ्या लागल्याचे समोर आले.

ही घटना हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत शिवसेना नेते महेश गायकवाड जखमी झाले आहेत.

त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे पोलीस निरिक्षकांच्या केबीनमध्येच गोळीबीर झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्ये एका विषयावर वाद सुरु होता. यावेळी कल्याण शिवसेना शहरप्रमुख शिंदे गट महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्येच गोळीबार झाला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. आमदार गायकवाड आणि सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमक काय घडलं?

उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये एका विषयावरून चर्चा सुरु असताना बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ आणि गोळीबार झाला. या घटनेमध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना २ गोळ्या लागल्या आहेत.

याप्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस ठाणे व परिसरात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्या हाणामारी झाल्याचे प्रकार झाले आहेत. असं पोलिसांचे म्हणणे आहे. आमदार गणपत गायकवाड आणि सुरक्षा रक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या