रत्नदीप मेडिकल अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात दुसर्‍या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन

 


तहसील कार्यालय परिसरात विद्यार्थीनी दिल्या
 डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात घोषणा

जामखेड

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून सुरू असलेले विद्यार्थीचे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच राहीले. याच अन्याया विरोधात आज गुरुवार दि ७ रोजी पासुन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे देखील विद्यार्थींसमवेत आमरण उपोषणास बसणार आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी की काल मंगळवार दि ५ रोजी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आज बुधवार दि ६ मार्च रोजी विद्यार्थी व संस्था चालक डॉ. भास्कर मोरे यांना उपविभागीय अधिकारी सायली सोळंके तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर भास्कर मोरे हे जो पर्यंत तहसील कार्यालयाच्या परीसरात आमच्याशी चर्चा करण्यासाठी येत नाहीत तो पर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आसे सांगुन डॉ मोरे यांच्या विरोधात विद्यार्थीनी घोषणा दिल्या.

अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक हे विद्यार्थीन समोर चर्चा करण्यासाठी डॉ भास्कर मोरे यांच्या समवेत तहसील कार्यालय परीसरात आले होते. यावेळी डॉ. भास्कर मोरे यांना विद्यार्थींच्या प्रश्नांच्या अनुशंगाने बोलण्यास सांगितले मात्र विद्यार्थींना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले व गोंधळ उडाल्याने सुरु असलेली चर्चा थांबली होती.अखेर पुन्हा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन पुन्हा प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी प्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या बरोबर संस्था चालक मोरे यांच्या बरोबर चर्चा होणार होती परंतु उपविभागीय अधिकारी यांनी फक्त विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनाच बोलविले स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार यांना परवानगी नाकारली त्या मुळे बराच वेळ पोलीस निरीक्षक महेश पाटील व स्थानिक कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. 

तरीही फक्त विद्यार्थी व विद्यार्थीनी व संस्था चालक यांनाच चर्चेसाठी बोलावले यावेळी बराच काळ चर्चा सुरू होती नेमकी काय चर्चा झाली हे समजू न शकल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला त्यावेळी पुन्हा स्थानिक कार्यकर्ते पांडुरंग भोसले, रमेश आजबे, आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, मनसे ता. अध्यक्ष प्रदीप टापरे, केदार रसाळ, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, यांना व काही पत्रकार यांना चर्चा साठी बोलवण्यात आले होते. या दरम्यान पोलीस निरीक्षक महेश पाटील व आमदार रोहित पवार यांचे पीए यांच्यात शाब्दिक चकमक उडाली अशा प्रकारे गेली तीन तासा पासुन विद्यार्थीनी दिलेल्या निवेदनावर तहसील कार्यालयात चर्चा सुरू होती.आज पासून आमरण उपोषण  

संस्था चालकाकडुन विद्यार्थींना समाधान कारक उत्तर न मिळाल्याने विद्यार्थी व शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे विद्यार्थींनसमवेत आज दि. ७ तारखे पासुन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. तसेच जो पर्यंत संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू येत नाहीत तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असे देखील शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी पत्रकारांना सांगितले. 


 


आंदोलनकर्ते विद्यार्थी, विद्यार्थीनी व संस्था चालक यांच्या समवेत चर्चा होऊन या संदर्भात वरीष्ठांना तसेच संबधित विद्यापीठाचे कुलगुरू यांना सविस्तर अहवाल पाठवण्यात येणार आहे व तसेच संस्था चालकांना या संदर्भात लेखी मागितले आहे आशी माहिती उपविभागीय अधिकारी सायली सोळंके यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या