अंशदाना बद्दल सहकार भारती आक्रमक



महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याच्या संदर्भात शासनाने अंशदानासंदर्भात नुकत्याच काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने या विषयावर व्यापक चर्चा करून यात काही बदल सुचविण्याच्या उद्देशाने सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने नुकतेच एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक पुणे येथील कॉसमॉस बँकेचे मुख्यालय कॉसमॉस टॉवर येथे अतिशय उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला महाराष्ट्रातील काही प्रमुख पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अंशदानाच्या संदर्भातील अनेक मुद्द्यांवर तज्ञ मंडळींनी आपली मते मांडली. शासनाने काढलेल्या अंशदानासंदर्भातील परिपत्रकामध्ये सहकार भारतीने काही बदल सुचविलेले आहेत. लवकरच ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
बैठकीला सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री विवेकजी जुगादे यांच्यासह पतसंस्था राष्ट्रीय सहप्रकोष्ठ प्रमुख श्री विजयजी देशमुख, महाराष्ट्र पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख डॉ शांतीलाल सिंगी, सहप्रमुख ॲड रविकाका बोरावके यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी NAFCUB नवी दिल्ली येथे उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आल्याबद्दल कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मा श्री मिलिंदजी काळे यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार भारतीच्या वतीने हृदय सत्कार सुद्धा करण्यात आला.

या बैठकीला महाराष्ट्राच्या सहकारी पतसंस्था क्षेत्रातील दिग्गज मंडळी अँड श्री दीपकजी पटवर्धन, श्री किशोरजी बावणे, श्री नारायणजी वाजे, श्री आबासाहेब देशमुख, श्री मधुसूदनजी पाटील, श्री वासुदेवजी काळे, श्री वसंतजी गुंड, श्री जवाहरजी छाबडा, श्री रामभाऊजी लेंभे, डॉ श्री जयंतजी ओक, श्री आबासाहेब शेडगे, श्री किरणजी करकमकर, श्री श्यामकुमार लोखंडे, श्री अमितजी ओझे, डॉ अशोकजी खोपे, श्री राजीवजी शेलकर, श्री परेशजी बागवे, सौ प्रतिभाताई कांचन, श्री संदीपजी कांचन यासह सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा डॉ शशिताई अहिरे, सहसंघटन प्रमुख श्री प्रवीणजी बुलाख, प्रदेश कार्यालय मंत्री श्री श्रीकांतजी पटवर्धन, पुणे विभाग प्रमुख श्री गिरीशजी भवाळकर, श्री प्रवीणजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या