दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला. त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या