अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं ते निवडणुक लढण्याची शक्यता  आहे.

मुंबईत उत्तर-पश्चिम मतदारसंघातून म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदा लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
यावेळी अभिनेता गोविंदा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले.
पक्ष प्रवेशावेळी अभिनेता गोविंदा म्हणाले की, "मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मला जी जबाबदारी देईल, ती योग्य रितीने पार पाडेन."
सिनेसृष्टी मुंबईत आहे आणि त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचं यावेळी गोविंदा यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणूक लढवणार का, याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, गोविंदा म्हणाले, अजून ते काही ठरवलं नाहीय.
तर एकनाथ शिंदे म्हणाले की, गोविंदा यांनी कुठलीही अट घातली नाहीय. ते 14 वर्षे राजकीय वनवासात होते, आता चांगली माणसं सत्तेत आहेत, म्हणून ते समोर आलेत. ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील.
जेव्हा जेव्हा सिनेकलाकारांवर संकट आलं होतं, तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मदत केली होती, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.यापूर्वी 2004 साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोविंदा यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव गोविंदांनी केला होता.
2004 ते 2009 हा खासदार म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गोविंदा यांनी निवडणूक लढली नाही आणि ते राजकारणातूनही बाहेर पडले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या