भर सभेत निलेश लंकेंनी दिला आमदारकीचा राजीनामा,अजित पवारांना मोठा धक्का!

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांनी आमदारीचा राजीनामा दिला आहे. दक्षिण नगरमधून भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात निलेश लंके निवडणूक लढवणार आहेत. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.  
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तेव्हापासून अहमदनगरची जागा खूप चर्चेत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात लढत होणार आहे.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
राजीनामा देताना निलेश लंके यांना अश्रू अनावर झाले. आपल्याला लोकसभा लढवायची असेल तर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे लंके म्हणाले. यावेळी त्यांच्या भावनांचा बांध फुटला. ते म्हणाले आपल्याला रडायचं नाही लढायचं आहे. मी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा पाठवत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या