अखेर आ.निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा

 



निर्णय घेताना अश्रू अनावर, घेतली शरद पवारांची तुतारी हाती....



पारनेर : पारनेर नगर विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने विधान सभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.आमदारकीचा राजीनामा न देता लोकसभा लढविली तर, आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाई होवु शकते. शिवाय निलंबित केले जावु शकते. परत निवडणुक लढवता येणार नाही. या गोष्टीचा विचार करत,आ.लंके यांनी कार्यकर्त्यांना विचारात घेत,राजीनामा देण्याची तयारी केली आणि राजीनामा विधानसभेचे अध्यक्षांना पाठविला.

पारनेर तालुक्यातील सुपा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामधे आमदार लंके यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठविल्याचेही सांगीतले.हात उंच करुन त्यांनी सर्वांना राजीनाम्याचे पत्राचे झेराॅक्स दाखविले.

   आमदार निलेश लंके यांनी राजीनामा देण्याच्या विचार व्यक्त करत असताना त्यांना भावना दाटुन आल्या.यावेळी त्यांना त्यांच्या डोळ्यांतील अश्रु आवरले नाहीत. राजीनाम्याचे पत्र हातात घेऊन हात उंचावत उपस्थित कार्यकर्त्यांना दाखवत त्यांची सर्वांची संमती घेतली. यावेळी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी गावोगांवच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाखो रुपयांची  मदत रोख स्वरुपात,चेक स्वरुपात आणि आकडेवारीनुसार जाहीर केली .

    आमदारकीचा राजीनामा जाहीर केल्यानंतर आमदार निलेश लंके या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,पहिले आघाडीचे सरकार जावून हे दुसरे युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर यात सहभागी होवून मंत्री झालेल्या काहींनी मला व माझ्या कार्यकर्त्यांना जाणीव पुर्वक त्रास दिला आहे.अनेकदा अधिकार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर दबाव आणला. मला वैयक्तिक जीवनात ही खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला.फक्त आडवा आणि जिरवा,जिरवी करण्याचा प्रयत्न केला.मी माझ्या राजकीय कारकिर्दीमधे विरोधी पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना कधीही त्रास दिला नाही.माझ्या राजकीय जीवनामधे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी वाईट काळात खूप मदत केली, त्यांचेही ‌ऋण विसरु शकणार नाही.तसेच,मी माझ्या जीवनात कधीही देव पाहिला नाही, मात्र देशाचे नेते,आमचे नेते शरदराव पवार साहेब यांच्यात देव पाहिला. त्यांना उतार वयामधे यातना होतात. हेसुध्दा मला पहावत नव्हते.आणि मी त्यांना फसवू शकत नाही.तुम्हा सर्वांची माफी मागतो, विधानसभेचे चार ते पाच महिने शिल्लक असताना  मला राजीनामा द्यावा लागत आहे.

     ही निवडणूक पारनेर तालुक्याच्या दृष्टीने अस्तित्वाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे.त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी गहाळ राहू नये. प्रत्येक घरा घरात जा , शिवसेना व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना भेटा. त्यांची समजूत घाला,प्रसंगी माफी मागा. सध्या जिल्ह्यात अतिशय चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे.आरे, रावणाचा सुध्दा नाश झाला,तर तुम्ही कोण ? ही साधू संताची भुमी आहे . मी माझ्या आयुष्यात पैसे,संपत्ती कमविली नाही तर, जिवाभावाची माणसं,कार्यकर्ते कमविले आहेत. मी एका सामान्य कुटुंबातील व एका सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे.मी उभा राहतो म्हणुन उत्तरे कडच्यांना घाम फुटला आहे.आजवर यांनी खासदार झाल्यावर यांनी लोकांना फक्त आश्वासने दिली. जिल्ह्यात एकही भरीव काम केले नाही.यांचे स्वतःचे मेडीकल कॉलेज असल्याने त्यांनी जिल्ह्यामधे शासकीय मेडीकल कॉलेज येवु दिले नाही.का तर,मेडीकल काॅलेजमधुन आपल्याला पैसा मिळेल.कोटी कोटीची डोनेशन्स मिळतील. साकळाई पाणी योजनेसारख्या महत्त्वपुर्ण पाणी योजना पुर्ण करता आली नाही हे यांचे अपयश आहे.म्हणुनच सांगतो हे उत्तरेचे पार्सल आहे.तसेही २०२९ ला उत्तर लोकसभा मतदार संघ खुला होणार आहे.त्यावेळी तसेही ते तिकडे जाणारच आहेत.त्यांना आत्ताच पराभूत करुन तिकडे पाठवा.हा तसाही आपल्या तालुक्या बाहेरचा उमेदवार आहे.मी तुमच्या घरातला उमेदवार आहे याचा सतसद्वविवेक बुध्दीने विचार करा.कार्यकर्त्यांनी सावध रहा कोणत्याही परिस्थितीत ही लोकसभेची निवडणूक आपल्याला आता लढवायची आणि जिंकायची आहे. मलाही अनेकांनी मॅनेज करायचा प्रयत्न केला, पण मी मॅनेज होणाऱ्यातला नाही आणि माझे कार्यकर्तेसुध्दा कुणाला मॅनेज होत नाहीत.मी लोकांची सेवा करताना २४ तास व  ३६५ दिवस काम करतो. मला वैयक्तीक काही कमवायचे नाही.मी रात्री बेरात्री लोकांचे प्रश्न सोडवितो.हे झोपेत असताना मी पहाटे पहाटे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करुन त्यांना धीर दिला.त्यावेळी हे झोपत होते. यांच्या झोपा होत नाही.आम्हीसुध्दा छत्रपतींच्या विचारांचे मावळे आहोत, आमची औलाद शेपूट घालणाऱ्यांची नाही.मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो.येथून पुढे आमच्या कार्यकर्त्यांवर वार केले ना..तर ते सहन केले जाणार नाहीत. जश्यास तसे उत्तर दिले जाईल.ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.मी हि निवडणुक दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा आत्मविश्वासही आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला .

     यावेळी भाषण झाल्यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी त्यांना पक्षाचा गमचा घालत, त्यांच्या हातात तुतारीचे चिन्ह दिले.यावेळी शरद पवार जिंदाबाद, निलेश लंके जिंदाबादच्या घोषणांनी परीसर दूमदूमुन गेला.

 यावेळी व्यासपीठावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,काँग्रैसचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले, अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर,माजी सभापती सुदाम पवार,ठकाराम लंके,तालुका व जिल्हा भरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनाम्याचा निर्णय जाहीर करताना त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या, तद्नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पक्षाचा गमचा निलेश लंकेच्या गळ्यात घालून तुतारी हाती देत पक्ष प्रवेश दिल्याचे जाहीर केले. कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ मोठ्याने शरद पवार, निलेश लंके जिंदाबादच्या घोषणा दिल्या.



निवडून यायचे दक्षिणेतुन कार्यक्रम मात्र उत्तरेत..

सुजय विखे हे नगर दक्षिणेतून निवडून गेले.मात्र त्यांनी सर्वच कार्यक्रम उत्तरेत घेतले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे कार्यक्रम लोणीत घेतले.मुख्यमंत्री आपल्या दारी हा कार्यक्रम सुध्दा लोणीत घेतला.पशुसंवर्धन विभागाचे प्रदर्शन शिर्डीत घेतले.जिल्हा परिषदेचा सुमारे ५०० कोटींचा निधी राहाता तालुक्यात वळविण्यात आला. ज्या लोकसभा मतदारसंघातील जनतेने सुजय विखे यांना निवडून दिले त्यांच्या प्रती काहीच उत्तरदायित्व असू नये का..? हि किती मोठी खेदाची बाब आहे.

- निलेश लंके

आमदार पारनेर.

छाया : दत्ता गाडगे

पारनेरमध्ये सुपा येथील कार्यकर्ता मेळाव्यात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आ.निलेश लंकेंनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करत तुतारी हाती घेतली.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी त्यांचा गमचा घालत सन्मान केला.


यावेळी लंके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांच्यासह पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखेंवरही आरोप केले.नगर जिल्हयामधे विखे कुटूंबाने कुठलेही भरीव काम केलेले नाही.मागच्यावेळी लोकसभेला सुजय विखे विजयी झाले.मात्र,त्यांनी नगर दक्षिणमधील सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळींना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते, नेतेमंडळींना कधीही सन्मान दिला नाही.कुणाचेही कधीही फोन उचलले नाहीत.माझ्याकडे जास्तीत जास्त मिसकाॅल पडलेल्या माणसाला माझा पहीला काॅल असतो.कोव्हिडच्या काळात आपण काम केले३२ हजार लोकांचे प्राण वाचविले आणि हे घरात झोपले.मतदार संघामधे यांनी फक्त जिल्हयातील पुढाऱ्यांचे खच्चीकरण करणे,दबावतंत्र राबविले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर शासकिय अधिकाऱ्यांना दावणीला बांधल्यासारखे विखे पिता-पुत्र वागवितात. पिता-पुत्रांना सत्तेची मस्ती चढली असल्याचेही लंके म्हणाले. नगर-मनमाड तसेच पाथर्डी रस्त्यासाठी मला उपोषण करावे लागले.लोकप्रतिनिधी उपोषणास बसलेला असतानाही विखे पितापुत्रांनी उपोषणस्थळी अधिकाऱ्यांना येऊ दिले नाही.विखे यांच्या हुकूमशाहीचा हा उत्तम नमुना असल्याचेही आमदार निलेश लंके म्हणाले.


यावेळी झालेल्या मेळाव्यात आमदार निलेश लंके यांनी तब्बल २ तास आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला.ते म्हणाले आरे, आमच्या रक्तात दम आहे. माझ्या छातीवर वार केले असते तरी चालले असते परंतु, माझ्या कार्यकर्त्यांवर वार करता.म्हणुनच आज त्यांच्यावर ही वेळ आली असल्याचे सांगत आमदार निलेश लंके यांच्या भावना अनावर झाल्या व मला कठोर निर्णय घ्यावा लागतोय असे सांगत,मला आता राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या