नऊ वर्षाच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार

 अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार 

जागतिक महिला दिन उघड झाली घटना

दोन जण अटकेत, 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडीश्रीगोंदा प्रतिनिधी  :-

 ८ मार्च म्हणजे सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र श्रीगोंद्यात एका ९ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावात नऊ वर्षाच्या बालिकेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार जबरी संभोग केला, असून त्याचे मोबाईल मध्ये  चित्रीकरण केले. ते नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब उघड झाली.

 त्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला.

मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे. 

या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत. मात्र जागतिक महिलादिनी असा प्रकार घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या