गावातील यात्रा उत्सव एकोप्याने व आनंदाने साजरा करावा : पी.आय.दशरथ चौधरी

 श्रीराम नवमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती



जळगाव :

श्री रामनवमी,भारतरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव पंचक्रोशीतील समस्त नागरिकांनी एकत्र यावे व सर्व धार्मिक उत्सव साजरे करावे व धार्मिक सलोखा जपावायासाठी सर्वांनी वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. या मागचे पूर्वी जे घडले आहे ते सर्वानीच सगळे विसरावे आणि जळगाव पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी पुन्हा एकदा नवीन उत्साह आणि जोमाने एकत्र यावे श्रीराम नवमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गावातील यात्रा उत्सव एकोप्याने व आनंदाने साजरा करावा असे आवाहन श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पी.आय.दशरथ चौधरी साहेब ग्रामस्थांना केले.

या प्रसंगी पी.एस.आय.रावसाहेब शिंदे साहेब गोपनीय खात्याचे अनिल शेंगाळे साहेब उपस्थित होते.राहाता तालुक्यातील जळगाव येथे (दि.१४) ते (१७)एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,श्रीराम नवमी,ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज व मासूम बाबा यात्रा असे विविध उत्सव साजरे होणार आहेत या अनुषंगाने शनिवारी (दि.१३) जळगाव ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पी.आय.दशरथ चौधरी साहेब बोलत होते.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पी.आय.दशरथ चौधरी साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम एकत्रित येऊन साजरे करणार असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले त्यासोबतच धार्मिक सलोखा कायम ठेऊन यात कुठलेही राजकारण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल ठरलेल्या नियोजनानुसार वेळेचे बंधन पाळून आयोजित कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील त्यात कुठलेही गालबोट लागले जाणार नाही याची काळजी व खबरदारी घेतली जाईल गावकरी सर्व धार्मिक उत्सव एकत्र येऊन साजरे करतील पोलिस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनेचे पालन सर्व ग्रामस्थ करतील अशी सर्वस्वी जबाबदारी जळगाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी एकमताने घेतली आहे.

या प्रसंगी जेष्ठ नेते दिलीप बाळासाहेब चौधरी,सोसायटी चेअरमन सुरेश राजाराम औताडे, यात्रा कमिटी अध्यक्ष किरण सोपान चौधरी,उपाध्यक्ष पंडित नाना चौधरी,पोलीस पाटील राजेंद्र गायकवाड, मच्छिंद्र चंद्रभान चौधरी,अरुण दयानंद गायकवाड, राजेंद्र नाना गायकवाड,विजय बबन चौधरी,अरुण नामदेव चौधरी, बाळासाहेब बबन चौधरी,फिरोज करीम शेख,अमोल अनिल थोरमोठे,भागवत मिनीनाथ वाघ, जितेंद्र रायभान चौधरी, विजय महाराज चौधरी, अशोक बापुराव शिंदे, रमेश सावित्रा चौधरी, डॉ.गोरक्षनाथ चौधरी,तुषार चौधरी,सतीश चौधरी, विजय भास्कर चौधरी, महेश जबाजी चौधरी, राजु सत्तार शेख, पत्रकार बाबासाहेब चौधरी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते या प्रसंगी विजय महाराज चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या