महिला धान्य दुकानदारास दमदाटी, गुन्हा दाखल

 महिला धान्य दुकानदारास दमदाटी केल्याप्रकरणी: 

मुकींदपुर येथील तिघांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


नेवासा :


रेशन धान्य दुकानासमोर येऊन दमदाटी करुन धान्य वाटप थांबविल्या प्रकरणी मुकींदपूर येथील रहिवासी व गुन्ह्यातील आरोपी अशोक विठ्ठल निपुंगे,कृष्णा यादव निपुंगे,सतीश दत्तात्रय निपुंगे,सर्व राहणार मुकींदपुर ता.नेवासा यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६०  ६०२/२०२४ भा.द.वी कलम ५०६ प्रमाणे नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घडलेली हकिकत अशी की जयश्री बाळासाहेब दरंदले (वय ४५) वर्ष राहणार मुकींदपुर ता.नेवासा ह्या शनिवार (दि.२०) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुकींदपूर येथील सरकारी रेशन धान्य दुकानात धान्याचे वाटप करत असताना  आरोपी अशोक विठ्ठल निपुंगे,कृष्णा यादव निपुंगे,सतीश दत्तात्रय निपुंगे,हे तिघे मद्य धुंद अवस्थेत फिर्यादीच्या रेशन दुकानासमोर आले व फिर्यादीस म्हणाले की तुम्ही लोकांना धान्य देत नाही असे खोटे आरोप व दमदाटी केली व सदर धान्य वाटप तात्काळ थांबव बाहेर निघ. 

असे आरोपी म्हणाले महिला दुकानदाराला आरे-तुरेची उद्धट भाषा वापरत व्यवस्थितरित्या चालु असलेले धान्य वाटप संबंधित आरोपींनी दमदाटी करत थांबविले व कोणतेही अधिकारी किंवा ग्रामदक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता धिंगाणा घालत सरकारी रेशन धान्य दुकानाला या तिन्ही आरोपींनी टाळे लावले आहे या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार श्रीमती जयश्री बाळासाहेब दरंदले यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पो.ना लिपने हे करत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या