श्रीरामपूर-अभिनव योजना व नाविन्यपुर्ण कल्पना राबवणार्या येथील श्री सिध्दीविनायक पतसंस्थेस या वर्षी ७१ लाख ११ हजार रुपयाचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.वासुदेव काळे यांनी दिली.
या वर्षी समिश्र व्यवसाय ७८ कोटी ७२ लाख रुपयाचा झाला असुन ४७ कोटी ठेवींचा टप्पा पार केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
संस्थेचे कर्ज वितरण ३१ कोटी ३५ लाखाचे असुन विवीध सक्षम अशा १५ बॅंकामध्ये १८ कोटी ४९ लाखांची गुंतवणुक असुन ही गुंतवणुक सहकार खात्याच्या २६% गुंतवणुक असावी या निकषा पेक्षा जास्त १३% असुन एकुण गुंतवणुक ३९% आहे.अशी माहिती संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.सुनील बोलके यांनी दिली.
जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेचे श्रीरामपूर शहरात दोन शाखा व मुख्य कार्यालय स्वतंत्र असुन प्रती कर्मचारी व्यवसाय ५ कोटीचा आहे.श्री सिध्दीविनायक पतसंस्था नेहमीच व्यवसायीक द्रुष्टीकोन ठेवुन ठेवुन काम करत असल्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विश्वास संस्थेने मिळवला असल्याचे प्रतीपादन श्री.बोलके यांनी केले.
विवीध क्षेत्रात काम करणारे सहकारी संचालक,संस्थेप्रती निष्ठा जपणारे उत्साही कर्मचारी,दैनिक,आर्वत प्रतिनीधी व वीवीध सल्लागार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे संस्था प्रगती पथावर असुन भविष्यात महिला व तरुणांसाठी स्टार्टअप च्या माध्यमातुन सर्व प्रकारचे मार्गदर्शन व अल्प दरात अर्थपुरवठा केला जाईल अशी माहिती संस्थेचे CEO श्री.अमोल जोशी यांनी यावेळी दिली.
0 टिप्पण्या