दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं केजरीवाल यांना  1 जूनपर्यंत हा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठानं शुक्रवारी हा जामीन मंजूर केला. त्यांनी 2 जूनला पुन्हा स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावं असं कोर्टानं म्हटलं आहे.
केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचार करता यावा म्हणून कोर्टानं हा निर्णय दिला आहे. 21 मार्चपासून केजरीवाल ईडीच्या कोठडीत आहेत.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत केजरीवालांच्या जामीन आर्जाला ईडीने केला विरोध केला होता. निवडणुकीचा प्रचार करणं हा मूलभूत अधिकार नाही किंवा घटनात्मक अधिकारही नाही, असं ईडीनं गुरुवारी म्हटलं होतं.
जस्टिस संजीव खन्ना यांच्या पीठानं केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी निर्णय देणार असं स्पष्ट केलं होतं.
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता केजरीवालांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या