अखेर प्रतिक्षा संपली, उद्या लागणार बारावीचा निकाल, असा पाहा तुमचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी हे निकालाची वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या च्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने 21 मे ला आपला निकाल पाहू शकणार आहेत.दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या.
1.mahresult.nic.in
2.mahahsscboard.in
3.hsc.mahresults.org.in
4.hscresult.mkcl.org
5.results.gov.in

या संकेस्थळावर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे.
यावर्षी राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दरवेळी प्रमाणे यंदा देखील राज्यात संपूर्ण परीक्षा ही काॅपीमुक्त पार पडलीये. बोर्डाकडून या परीक्षेची जोरदार तयारी काही महिन्यांपासून सातत्याने सुरू होती. आता उद्या निकालाची घोषणा देखील केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या