...त्या आरोपीमुळे मुलाला अमेरिकेत टाकले


आ. तनपुरे यांच्या पत्नीची सोशल मीडियात पोस्ट


श्रीरामपूर-


दोन वर्षापूर्वी प्राजक्त तनपूरे यांचा मुलगा सोहेल हा ज्या स्कुलमध्ये शिकत होता त्याच स्कुलमध्ये पुण्यातील घटनेतील हे आरोपी तरूणांचा ग्रुप शिकत होता. मात्र शिक्षणापेक्षा हा ग्रुप इतरांना खुप त्रास देत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून तनपूरेंनी आपल्या मुलाला स्कुलमधून काढले होते. सध्या तनपुरेंचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी या अपघातानंतर सोशल मीडियावर ही पोस्ट केलीय.

पुण्यात कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाने आलिशान कारने मध्यरात्री दोघांना उडवलं. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक केलीय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी या अपघातानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. कल्याणीनगर कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या असं तनपुरे यांनी म्हटलंय.दोन वर्षापूर्वी प्राजक्त तनपूरे यांचा मुलगा सोहेल हा ज्या स्कुलमध्ये शिकत होता त्याच स्कुलमध्ये पुण्यातील घटनेतील हे आरोपी तरूणांचा ग्रुप शिकत होता. मात्र शिक्षणापेक्षा हा ग्रुप इतरांना खुप त्रास देत होता. वर्ण, जाती , दिसण्यावरून टोमणे मारणं अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून तनपूरेंनी आपल्या मुलाला स्कुलमधून काढले होते. सध्या तनपुरेंचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. आरोपी तरुण ज्यांच्यासोबत असायचा त्याच्या मित्रांच्या ग्रुपने आपल्या मुलाला त्रास दिला गेला होता असं सोनाली तनपुरे यांनी म्हटलं.

---



एक आई म्हणून केलेलं ट्विट असल्याचं सोनाली तनपुरे म्हणाल्या आहेत. याचा कुठलाही राजकीय संबध नाही. अपघातात दोन जणांचा जिव गेला त्यामुळे भावनिक झालेल्या आईने केलेलं ते ट्विट आहे. बेदरकारपणे गाडी चालवणं, रात्री उशिरापर्यंत मुलांच पबमध्ये दारू पिणं, इतरांना त्रास देत असूनही पाठीशी घालणं यास स्कुल प्रशासन नाही तर पालक जबाबदार असल्याचं त्यांच म्हणणं आहे.. मुलांना चांगले संस्कार दिले जावे हि त्यांची अपेक्षा आहे. पुण्यात कुठेतरी पब संस्कृती फोफावतेय याचंही त्यांना वाईट वाटतंय असंही त्यांनी  सांगितलं.





 |

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या