Crime: एएमआयएम नेते मालेगाव माजी महापौरांवर गोळीबार!

 



मालेगाव : एएमआयएमचे मालेगाव महानगर अध्यक्ष तथा मालेगावाचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला. मलिक हे मध्यरात्री चहा पिण्यासाठी हॉटेलवर बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर तीन गोळ्या फायर केल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात माजी महापौर मलिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

साधारणतः मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात मलिक गंभीर जखमी झाले आहेत. मलिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी मलिक यांना नाशिक येथे हलवण्यात आलं आहे. अब्दुल मलिक हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते, त्यावेळी अज्ञातांनी मलिकांवर गोळीबार केला. MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी केली आहे. तसेच, हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. त्यासोबतच मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोप आमदार मुफ्ती यांनी केले आहेत. दरम्यान, अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावरील हल्लानंतर मालेगावात तणावाचं वातावरण पसरलं आहे. 

नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर आणि MIM चे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या हाताला, पायाला आणि छातीजवळ गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे. मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवर मलिक एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार करून फरार झाले. या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण असून, पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मालेगाव MIM चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी भेट घेत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोपही आमदार मुफ्ती यांनी केला. दरम्यान राजकीय वादातून गोळीबार केल्याचं बोललं जात आहे. मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या