45 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिका अटकेत

 

श्रीरामपूर: वेतनश्रेणीची  खात्यामध्ये जमा झालेली फरकाची रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला म्हणून ४५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने मुख्याध्यापिकेला रंगेहात पकडले.

शहरातील बोरावके महाविद्यालया जवळील सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेची वेतनश्रेणीतील फरकाची रक्कम १ लाख ६५ हजार रुपये खात्यामध्ये जमा झाली होती, याबाबत प्रस्ताव पाठविला होता. 

प्रस्ताव पाठविला म्हणून मुख्याध्यापिकेने संबंधित शिक्षकेच्या पतीला ५० हजार रुपये मागितले तडजोडीअंती ४५ हजार रुपये देण्याचे ठरले.

काल दि. १२ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अहमदनगर येथील लाच लुचपत विभागाने सापळा रचून येथील बोरावके महाविद्यालया च्या पाठीमागे असणाऱ्या सुभद्राबाई गायकवाड मुलींच्या वस्तीगृहाच्या अधीक्षक कार्यालयात ४५ हजार रुपयांची लाच घेताना संगीता नंदलाल पवार ( वय ५३) मुख्याध्यापिका सुभद्राबाई गायकवाड प्राथमिक शाळा यांना रंगेहात पकडले.

 ही कारवाई लाच लुचपत विभागाचे उपाधीक्षक प्रवीण लोखंडे, निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, हवालदार हारुण शेख, बाबासाहेब कराड, किशोर लाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता शिंदे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या