श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज वर मळगंगा पॅनेलचे वर्चस्व...




९२.६३ टक्के मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.



( पारनेर प्रतिनिधी ) : 

राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व " ब " वर्ग तिर्थक्षेत्र असलेल्या पारनेर तालुक्यातील जगप्रसिध्द रांजणखळगे असलेले, कुंडपर्यटन स्थळ,श्रीक्षेत्र निघोज येथील श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज,येथील विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवडणुक सन :  २०२४-२५ ते २०२९-३० साठी दि.२ जून रोजी पार पडली.

रविवार  दि.२ जून २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पुष्कर लाॅन्स निघोज येथे पार पडली.यावेळी मतदानाची एकुण टक्केवारी-९२.८०  टक्के मतदान झाले आहे.निवडणुकीसाठी एकुण मतदान - ११८१ आहे. तर,प्रत्यक्षदर्षी झालेले मतदान - १०६९ झाले.बाद मते २५ आहेत. २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी तब्बल ४१ उमेदवार रिंगणात उतरुन आपले नशिब आजमावत होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आणि त्याच ठिकाणी पुष्कर लाॅन्स निघोज येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली.झालेल्या निवडणुकीमधे सत्ताधारीमळगंगा पॅनेलचे २० उमेदवार विजयी झाले असुन, माऊली मळगंगा परीवर्तनचा १ उमेदवार विजयी झाल्यामुळे माऊली मळगंगा परिवर्तन पॅनेलचा चंचुप्रवेश झाला आहे.


उमेदवार निहाय झालेले मतदान खालीलप्रमाणे,


मळगंगा पॅनेल विजयी उमेदवार व मिळालेली मते.


१)कवाद वसंत बाबाजी - ७९५

२)कवाद विठ्ठल भाऊसाहेब - ७२४

३)कळसकर शांताराम बापू -६३५

४)ढवळे लक्ष्मण रामभाऊ - ६४१

५)रसाळ अमृता महादु - ७५१

६)रसाळ संतोष भाऊ - ७१३

७)लंके शांताराम भाऊ - ७९१

८)लंके ज्ञानेश्वर दगडु - ५८५

९)लंके ठकाराम बाळु - ७४०

१०)लंके अनिल रघुनाथ - ७५४

११)लामखडे शंकर चंद्रकांत - ७०९

१२)लामखडे ज्ञानेश्वर रामदास - ६७७

१३)लामखडे रोहीदास हरीभाऊ - ५९३

१४)लाळगे दिलीप यशवंत - ५५६

१५)वराळ मंगेश सखाराम - ५६०

१६)वराळ सिमा संदिप - ७३७

१७)वरखडे रामदास महादु - ६९१

१८)वरखडे अशोक बापु - ५७८

१९)वरखडे मोहीनी सोमनाथ - ५८१

२०)शेटे विश्वास सखाराम - ६८०

२१)ससाणे रामदास नानाभाऊ - ६५८


माऊली मळगंगा परिवर्तन पॅनेलचे  उमेदवार व मिळालेली मते.


१)कवाद मोहन जयवंत - ३६९

२)ढवळे शांताराम ठकाराम - ३४६

३)पवार सुनिल रघुनाथ - ३७५

४)भूकन शिवाजी लक्ष्मण - २६२

५)राऊत मनोहर बाबाजी - ४०५

६)लंके दत्तात्रय श्रीपत - ३४६

७)लामखडे देवराम गोविंद - ४३९

८)लाळगे राजेंद्र भागा - ५१६

९)वराळ संतोष खंडु - २७८

१०)वराळ राहुल भाऊसाहेब - ३१४

११)वराळ रावसाहेब आनंदा - ३४८

१२)वरखडे ज्ञानेश्वर विठ्ठल - ५३९

१३)वरखडे संदिप रामचंद्र - ३७१


माऊली मळगंगा परीवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार


१४)शेटे अनिल शिवाजी - ६३०

 

अपक्ष 

१५)गजरे काळुराम सहदेव - ३९

१६)ढवळे सदानंद भिकाजी - ३३

१७)ढवण दिलीप रामचंद्र - ५५

१८)ढवण रुपेश मारुती - ५४

१९)भूकन दत्तात्रय खंडु - १८२

२०)वराळ गणेश चंद्रकांत - ६४



चौकट :

ट्रस्टमधे महीलांना प्रथमच संधी..


विशेष म्हणजे मळगंगा ट्रस्टमधे मोहीनी वरखडे व सिमा वराळ या २ महीलांना प्रथमच  संधी मिळालेली आहे.

या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रभाकर कवाद यांनी काम पाहीले,त्यांना सहाय्यक म्हणुन महेश ढवळे यांनी तसेच, सहकार विभागातील ३ अधिकारी  व मदतनिस १२ अशा १५ लोकांनी काम पाहीले.निवडणुकी नंतर मत मोजणी प्रक्रिया त्याच ठिकाणी पार पडली.मतमोजणी प्रक्रिया दूपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत चालली होती.रात्री ११ नंतर उशीराने निवडणुक निर्णय अधिकारी प्रभाकर कवाद यांनी निवडणुक निर्णय जाहीर केला.

केंद्र १ साठी केंद्राध्यक्ष म्हणुन अंकुश गुंजाळ,केंद्र क्र.२ साठी केंद्राध्यक्ष म्हणुन दत्ता हांडे,केंद्र क्र.३ साठी केंद्राध्यक्ष म्हणुन सतिष मुळे यांनी काम पाहीले.सहाय्यक म्हणुन महेश ढवळे यांनी काम पाहीले.

 मागील ४२ वर्षामधे प्रथमच श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची प्रत्यक्षदर्षी निवडणुक, निवडणुक प्रक्रियेने झाली.यापूर्वी ट्रस्टची कधीही निवडणुक झाली नव्हती. बिनविरोध निवडणुकीची परंपरा यावेळी पहील्यांदाच खंडीत झाली आहे.विजयी मळगंगा पॅनेलचे नेतृत्व बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद,मा.सरपंच ठकाराम लंके यांनी केले तर,

पराभूत माऊली मळगंगा परीवर्तन पॅनेलचे नेतृत्व संदिप पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ,सुनिल पवार व  शिवा लंके यांनी केले होते.

यावेळी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली, पारनेर व निघोज पोलीसांनी चोख बंदोबस्त बजावल्यामुळे, निवडणुक प्रक्रिया शांततेमधे पार पडली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.निवडणुक प्रक्रिया शांततेत झाली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या