पढेगाव येथे बिबटयाची दहशत कायम कालवडीचा पाडला फडशा

श्रीरामपूर : बिबट्याच्या दहा ते बारा दिवसापासून तालुक्यातील पढेगाव दहशतीखाली असून शेतकरी दिपक बाबासाहेब येसेकर यांच्या वस्तीवरील गोठ्यातील नऊ ते दहा महिन्याची कालवड उचलून नेत नजीकच्या उसाच्या शेतामध्ये तिचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
मात्र पढेगावमध्ये बिबट्याचा आठ ते दहा सुळसुळाट सुरूच आहे.मागिल घटना ताजी असतानाच काल पुन्हा बिबट्याने त्याच्या वस्तीवर कुत्र्याचा फडशा पाडला.याबाबतीत घटनेची कल्पना वनधिकाऱ्याना देण्यात आली आणि घटनेचा पंचनामा करण्यात आला.मात्र शेतकऱ्याला योग्य कारवाई करून खबरदारी घेऊ आणि पिंजरा लावून देऊ असे आश्वासन देण्यात आले.आठ दिवस उलटून देखील अद्याप ही वनविभागाने येथे पिंजरा लावलेला नाही.विशेष म्हणजे वनाधिकारी मात्र घटनास्थळाकडे फिरकले सुद्धा नाही.वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी पढेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रंजित बनकर,प्रवीण लिप्टे अशोक बॅकेचे संचालक जितेंद्र तोरणे यांनी प्रशासनाकडे केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या