राम मंदिर उभारणीमुळे माझा पराभव

 

 माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचा दावा



श्रीरामपूर  : 


शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे.

तो रावणाची पूजा करतो व राम मंदिर उभारण्यात आल्याने तो नाराज झाला. त्याचा फटका बसून पराभव झाल्याचे ,शिर्डी लोकसभेला पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धक्कादायक दावा केला आहे. 

माजी खासदार सदाशिव लोखंडे हे नगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होते. शिर्डी येथे खासदार होण्यापूर्वी ते कर्जतचे पंधरा वर्षे आमदार होते. तेथील आपल्या समर्थकांच्या भेटीगाठीसाठी ते गेले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पराभवामागील कारणांची विचारणा केली. त्यावर सदाशिव लोखंडे यांनी अजब उत्तर दिले.


ते म्हणाले, शिर्डी मतदारसंघांमध्ये आदिवासी समाज लक्षणीय संख्येने राहतो. तो रावणाला मानणारा समाज आहे. राम मंदिर बांधल्यामुळे तो दुखावला गेला. त्यातून माझ्या विरोधात मते गेली. शिर्डी लोकसभेत साखर कारखानदारांचे मोठे साम्राज्य आहे. एक साखर कारखानदार दुसऱ्या विरोधात राजकीय लढाई करतो. त्यांच्यातील लढाईचाही मला फटका बसला, असे सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. लायकी नव्हती तरी निवडून दिला मागच्या पंचवार्षिकला तुला, कधी तुझ्या खुरुडयाबाहेर निघाला का, निवडून दिले त्यांच्यासाठी काय केले, कधी फिरला तरी का मतदार संघात, काय बोलतो की इकडे रावणाची पूजा करतात म्हणून निवडन नाही आलो, सत्तेसाठी इकडून तिकडे फिरणारा तू, काय सांगतो आम्ही रावण भक्त आहोत ते

    उत्तर द्याहटवा