'हिरकणी' महिला मंचचा आज उखाण्यांचा कार्यक्रम

 


श्रीरामपूर

दैनिक राष्ट्र सह्याद्री आयोजित हिरकणी महिला मंचच्या वतीने महिलांसाठी आज दि 23 जून रोजी श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहात उखाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


हिरकणीच्या या कार्यक्रमात नवीन सभासदांना ओळखपत्र वाटप व वर्षभरातील विविध कार्यक्रमाविषयी चर्चा तसेच नुकताच झालेल्या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी उखाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच नवीन हिरकणी सभासद नोंदणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.

 कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता श्रीरामपूर येथील आगाशी सभागृहात घेण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सह्याद्री हिरकणी मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या