Crime & Court: श्रीरामपूरचा वकील हेमंत थोरात, लक्ष्मण देशमुख यांना पाच वर्ष सक्त मजुरी!

 


न्यायालय मॅनेज करतो... रेल्वे अधिकाऱ्याकडून लाखोंची लाच

पुणे :  

 भारतीय रेल्वेच्या दौंड येथे नियुक्त मुख्य लोको इन्स्पेक्टर वीरेंद्रसिंग यादव यांच्याकडून 28 लाख 95 हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली दोशी ठरवत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी श्रीरामपूर येथील आरोपी ॲड. हेमंत थोरात आणि लक्ष्मण देशमुख यांना पाच वर्ष फक्त मजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपयाचा दंड ठोठावला. सीबीआय विशेष न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. 
सन 2014 मध्ये हा गुन्हा दाखल घडला होता. वीरेंद्र सिंग यादव दौंड येथील रेल्वे प्रशासनात लोको इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होता. त्याने १० कोटी रुपयांच्या हाय-स्पीड डिझेलच्या चोरी केल्याचा आरोप होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर यादव याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालय मॅनेज करण्यासाठी म्हणून श्रीरामपूर येथील वकील हेमंत थोरात व त्याचा साथीदार लक्ष्मण देशमुख यांनी यादव याच्याकडून 28 लाख 95 हजारांची लाच स्वीकारली होती. पोलीस चौकशीत यादवने ही माहिती दिल्यानंतर त्याची नार्को टेस्ट झाली. सत्यता पडताळल्यानंतर सीबीआय विशेष न्यायालयात हेमंत थोरात व देशमुख या दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची ही नार्कोटेस्ट झाली. त्यात दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली होती.या प्रकरणाच्या सुनावणीनंतर सीबीआय विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना पीसी ॲक्ट, 1988 च्या कलम 8 नुसार शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले. त्यांना प्रत्येकी पाच वर्षे सक्त मजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. त्याशिवाय, कलम 120-बँड अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्या प्रकरणात त्यांना 6 महिने तुरुंगवास आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंड आणि चूक झाल्यास 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, यादव याला यापूर्वीच दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तसेच त्याला रेल्वे प्रशासनातूनही बडतर्फ केले असल्याचे तर हेमंत थोरात याने उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या