Election: धनुष्यबाण आणि मशालीचा लढतीत कोण ठरले सिकंदर..!

  

गैरसमज दूर करणाऱ्या निवडणूक निकालातील महत्त्वाचे फॅक्ट



मुंबई : राज्यात पक्षफुटी झाल्यानंतर आणि मोठ्या घडामोडी घडल्यानंतर राज्यासह देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोण सरस ठरले हा सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्यांना जनता माफ करत नाही, हा समाज मात्र यंदाच्या निवडणुकीत खोटा ठरला. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळाले. 

राज्यातील या ४८ जागापैकी १३ जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होती. १३ जागांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुकाबला झाल्याचे पाहायला मिळाले. तर या १३ जागांपैकी ६ जागांवर ठाकरेंचे उमेदवार निवडून आले आहेत. तर इतर ७ जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत.


शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदारांनी बंड केलं. त्यानंतर राज्यात बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पुढे निवडणूक आयोगाने शिंदेंच्या शिवसेनेला 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह दिलं.


त्यानंतर आता झालेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेना फुटीचा फटका बसेल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. अशातच एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटापैकी शिंदे गटाचे ७ उमेदवार जिंकले आहेत, तर ठाकरे गटाचे ६ उमेदवार जिंकले आहेत.


कोणती शिवसेना कोणत्या जागांवर जिंकली?


बुलढाणा - शिवसेना(शिंदे गट)

यवतमाळ-वाशिम- शिवसेना(ठाकरे गट)

नाशिक- शिवसेना शिवसेना (ठाकरे गट)

औंरगाबाद- शिवसेना(शिंदे गट)

हिंगोली- शिवसेना (ठाकरे गट)

कल्याण - शिवसेना(शिंदे गट)

ठाणे - शिवसेना(शिंदे गट)

दक्षिण मध्य मुंबई - शिवसेना(ठाकरे गट)

उत्तर पश्चिम मुंबई - शिवसेना(शिंदे गट)

दक्षिण मुंबई -शिवसेना(ठाकरे गट)

मावळ - शिवसेना(शिंदे गट)

हातकणंगले- शिवसेना (शिंदे गट)

शिर्डी - शिवसेना(ठाकरे गट)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या