पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर अंतर्गत लोणी पोलीस स्टेशनचे नवीन कायद्यांचे अंमलबजावणी संदर्भाने जनजागृती अभियान

पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर अंतर्गत लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी गावात लोणी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची रॅली काढून लोणी गावातील नागरिकांना आजपासून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या नवीन कायद्यांविषयी माहीती दिली. 
1860 पासुन ब्रिटीश काळा पासुन चालु असलेले जुने कायदे केद्रशासनातर्फे बंद करण्यात आले असुन नवीन कायदे 1) भारतीय न्याय सहिता -2023 (BNS) 2) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 (BNSS) 3) भारतीय साक्ष अधिनियम 2023 ( BSA) आज दिनांक 01/07/2024 अशा कायदयांची अंमलबजावणी करण्यात आलेली असल्याचे सपोनि कैलास वाघ यांनी सांगीतले तसेच प्ले स्टोअर वर नवीन कायदयांबाबत अनेक अँप उपलब्द असुन सोशल मिडीयावरुन अधिक माहिती प्राप्त करण्याचे नागरिकांना आव्हान केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या